सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    26-11-2025 10:55:28

छत्रपती संभाजीनगर : समाजप्रबोधन व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले.संत जनार्दनस्वामी यांच्या वेरुळ येथील आश्रमात ॐ जगद्गुरू जनशांती धर्म या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. संत शांतीगिरी महाराज यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार. संजय केणेकर, आ. प्रशांत बंब, सुरेश चव्हाणके आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७५१ कुंड यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिव मूर्तिचे पूजन व उदघाट्न करण्यात आले. संत नागेश्वरानंद आणि संत अवीमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संत शांतीगिरी महाराजांच्या अनुग्रहाने लाखो लोकांचे जीवन बदलले. देश प्रगतीपथावर नेण्याचे सामर्थ्य संतांच्या मार्गदर्शनात आहे.


 Give Feedback



 जाहिराती