सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 शहर

दुगड शाळा परिसरात मध्यरात्री टोळीने केली तोडफोड; नागरिक दहशतीत

डिजिटल पुणे    26-11-2025 12:56:19

 पुणे : अंबेगाव खुर्दमधील दुगड शाळा परिसरात काल मध्यरात्री भीषण घटना घडली. रात्री साधारण १२.३० वाजण्याच्या सुमारास कोयता घेऊन आलेल्या एका गटाने परिसरात अचानक दहशत निर्माण केली. दुगड शाळा मागील अटल १२ भागात या टोळीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची बेछूट तोडफोड केली.मध्यरात्रीच्या शांततेत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला. अचानक आलेल्या या टोळीमुळे नागरिक भीतीने घराबाहेर पाहायलाही तयार नव्हते. मुलं, महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या तोडफोडीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून स्थानिक रिक्षाचालकाच्या रिक्षेलाही गंभीर हानी झाली आहे. उपलब्ध छायाचित्रांतून तोडफोडीची भीषणता समोर येते.स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, दुगड शाळा परिसरात यापूर्वीही काही संशयास्पद हालचाली आणि घटना घडल्या आहेत, परंतु मध्यरात्री कोयत्यासह टोळी फिरत असल्याची ही पहिलीच मोठी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही वाढल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून कोणत्या गटाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी दुगड शाळा परिसरात वाढीव पोलिस गस्त, सीसीटीव्ही तपासणी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.सध्या वातावरण तणावपूर्ण असून आम आदमी पार्टी शहराध्यक्ष प्रशांत कांबळे  सामाजिक न्याय विभाग यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज पुणे शहरांमध्ये वारंवार टोळी युद्ध कोयता घ्या ही वाढ चालली असून पोलीस प्रशासनाने हे सर्व मोडीत काढलं पाहिजे असे वक्तव्य केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती