कर्नाटक : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात रायचूर–कारवार मार्गावर गंभीर अपघात घडला आहे. केएसआरटीसीची बस अंकोला तालुक्यातील वज्रळी येथील नवमी हॉटेलजवळ नॅशनल हायवे 63 वर अचानक अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या भीषण अपघातात 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश होता.
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात रायचूर- कारवार मार्गावर अपघाताची एक गंभीर घटना समोर आली आहे. रायचूर-कारवार केएसआरटीसी बस अनियंत्रित होऊन अंकोला तालुक्यातील वज्रळी येथील नवमी हॉटेलजवळ नॅशनल हायवे 63 वर दरीत कोसळली. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश होता. ज्यात अपघातांची मालिका सुरूच असून मुंबई गोवा मार्गावर केमिकल ट्रक पलटी झाला असून कराड-विटा मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अतिवेगामुळे नियंत्रण सुटले
प्राथमिक तपासात चालकाचा अतिवेग हा अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. बस अनियंत्रित झाल्यानंतर चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि बस थेट दरीत कोसळली. घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. यल्लापूर व अंकोला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी प्रवाशांना अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात हलवले.
कराड-विटा मार्गावर भीषण अपघात; 2 मृत्यू
कराड-विटा मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशन ब्रिजजवळ ही धडक एवढी जोरदार होती की नेक्सन कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.मिळालेल्या माहितीनुसार, नेक्सन कार आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ओमकार थोरात (28) आणि गणेश थोरात (25) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघेही कराड तालुक्यातील ओंड गावचे रहिवासी होते. घटनेत ऋषिकेश थोरात आणि रोहन पवार हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई–गोवा महामार्गावर केमिकल टँकर पलटी
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथे केमिकलने भरलेला टँकर पलटी झाला. टँकरमध्ये कीटकनाशक असल्याचे समजते, आणि गळतीचा धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र टँकर रस्त्यावर आडवा गेल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यात अपघातांची मालिका सुरूच असल्याने वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे अनुसरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.