पुणे : विज्ञान आश्रम आणि इटन इंडिया फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम (सायन्स टेकनॉलॉजी इंजिनियरिंग, मॅथ्स ) प्रोग्राम अंतर्गत ‘व्यवसाय शिक्षण’ उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.पुण्यातील कोथरूड येथील जे. पी. नाईक सेंटर येथे हा कार्यक्रम दि.२५ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला. इससीईआरटी च्या सहाय्यक संचालक सौ. अरुणा यादव,ईटन इंडिया फॉउंडेशनचे प्रमुख प्रवीण कुमार,विज्ञान आश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी, उपसंचालक रणजीत शानभाग, विविध शाळांमधील ४० विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच ईटन चे प्रतिनिधी मिळून १०० हून अधिक जण उपस्थित होते.विज्ञान आश्रमाच्या प्रोग्रॅम मॅनेजर कोमल कदम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन श्रद्धा मयेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला विज्ञान आश्रमातील डिआयवाय (डू इट युअर सेल्फ लॅब)ची माहिती डी. आय. वाय. लॅबचे प्रमुख किशोर गायकवाड यांनी सर्व पाहुण्यांना करून दिली. या लॅब मध्ये वय वर्ष १० पासून पुढच्या सर्व शालेय गटातील तसेच ११ वी पासून पुढील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित विविध प्रकल्प स्वतः करून बघता येतात.त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन, उद्घाटन कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष सहभागाचे कृती-आधारित उपक्रम असे कार्यक्रम घेण्यात आले.
सायन्स टेकनॉलॉजी इंजिनियरिंग, मॅथ्स शिक्षण हा नवीन शैक्षणिक धोरण (एन ई पी) नुसार शिक्षण विषयक दृष्टिकोन आहे.त्यातून मुले दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात, याच बरोबर कोशल्य आधारित तंत्रज्ञान हि शिकू शकतात. आजच्या कार्यक्रमात स्टेम शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या पुण्यातील ९ शाळा सहभागी झाल्या होत्या. या सर्व शाळांना विज्ञान आश्रम इटन च्या सी. एस. आर. मदतीच्या माध्यमातून ६वी ते ८ विच्या विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देत आहे.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या २५ ते ३० प्रकल्पांमध्ये परसबाग, लाकूडकाम, बांधणी रंगकाम , भेट वस्तू देण्याची पेटी तयार करणे, अग्निविरहित स्वयंपाक, प्लंबिंग, विणकाम, भरतकाम, मातीकाम, मेहेंदी कला, टेराकोटासारख्या विविध व्यावसायिक कौशल्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विज्ञान आश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकामध्ये व्यावसायिक शिक्षणाची गरज, (STEM ) स्टेम प्रोग्रामची पार्श्वभूमी आणि शिक्षक प्रशिक्षणाची माहिती दिली. त्याच बरोबर शिक्षक प्रशिक्षणानंतर शाळांमध्ये प्रकल्पांची अंमलबजावणी प्रभावी आणि जलद गतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. इससीईआरटी च्या सहाय्यक संचालक अरुणा यादव या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
ईटन इंडिया फॉउंडेशन चे प्रमुख प्रवीण कुमार यांनी अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांच्या जडण घढणीसाठी शालेय स्तरावर व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या ईटन च्या सर्व पदाधिकाऱयांनीही मुलांनि सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले. प्रमुख कार्यक्रमानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि ईटन चे पदाधिकारी यांच्याकरिता काही नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये बांधणी चे रुमाल बनविणे, किचेन तयार करणे अशा उपक्रमाचा समावेश होता.