सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    27-11-2025 10:35:26

उरण : कस्टम हाऊस एजन्ट (सी एच ए )च्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व मराठी स्थानिक भूमीपुत्रांची संघटना असलेल्या न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत देशातील थलेसेमिया, अपघात ग्रस्त रुग्ण व दुर्गम आजारावरील शस्त्रक्रिया साठी लागणाऱ्या रक्ताची गरज लक्षात घेता रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत कर्मवीर भाऊराव पाटील  विदयालय पिरकोन (उरण )येथे तेरणा ब्लड बँक नेरुळ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांशी संपर्क साधून नाव नोंदणी करून रक्तदान शिबिरात सहभागी होऊन मोठया प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे रूपेश भगत -9619395292,  श्याम गावंड - 9664034347,  हनुमान म्हात्रे - 9867886480


 Give Feedback



 जाहिराती