सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 विश्लेषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो फेज २ ला मान्यता !खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिक बाग मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

डिजिटल पुणे    27-11-2025 11:25:45

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या ३१.६ किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो शहराच्या चारही बाजूला विस्तारणार असून पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे.

 

शहरातील मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. मेट्रो मार्गांच्या मंजुरीसाठी मोहोळ यांनी नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांची नुकतीच भेट घेतली होती.

 

पुण्यातील वाहतूक कोंडी हा जटिल प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-२ ला हिरवा कंदील दाखवत पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज-2 ला मंजुरी दिली आहे. या फेजमध्ये लाईन-4 खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला आणि लाईन-4A नळ स्टॉप–वॉरजे–माणिक बाग मार्गाचा समावेश असणार आहे.

 

या महत्त्वपूर्ण मंजुरीमुळे पुणे शहराचे मेट्रो नेटवर्क 100 किलोमीटरच्या पुढे जाईल, ज्यामुळे पुणेकरांना वाहतुक कोंडीतून दिलासा मिळेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येसाठी हा प्रकल्प विकासाची नवी दिशा ठरणार आहे.


बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 – खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी हडपसर हे इंटरचेंज स्थानक असेल. या दोन्ही उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिकांची एकत्रित लांबी ३१.६० किलोमीटर असून त्यावर एकूण २८ स्थानके असतील. यासाठी ९८५७ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

या नव्या मार्गिकांमुळे शहरातील रहिवासी भाग, आयटी पार्क व बाजारपेठांशी मेट्रोने जोडला जाईल. तसेच या दोन्ही मार्गिका सध्याच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांच्या जवळून धावणार असल्याने मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कायमच शहरांच्या सर्वांगीण, सुनियोजित आणि शाश्वत विकासावर भर दिला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विस्ताराला प्राधान्य दिले गेले आहे. मेट्रो हा त्यातील प्रमुख घटक असून शहरातील मेट्रोचे जाळे लवकरच शंभर किलोमीटरहून अधिक विस्तारेल, असे मोहोळ यांनी नमूद केले.

 

पुणेकरांसाठीच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांना मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचेही मी आभार मानतो, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

कसा आहे नवा मार्ग?
फेज-2 मध्ये दोन अत्यंत महत्त्वाच्या मार्गांना मान्यता मिळाली आहे. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी 31.636 किमी असून, यावर एकूण 28 एलिव्हेटेड स्थानके विकसित केली जाणार आहेत.

लाईन 4 : हा मार्ग खराडी – हडपसर – स्वारगेट – खडकवासला असा असेल.

 

लाईन 4A : हा मार्ग नळस्टॉप – वॉरजे – माणिक बाग यांना जोडेल.


 Give Feedback



 जाहिराती