उरण : उरण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आता रंगात आली असून प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षानी आपला संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. महाविकास आघाडी तर्फे प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक पदाचे उमेदवार ओमकार विजय घरत, कमल अशोक पाटील,लता शेखर पाटील व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी प्रभाग क्रमांक १० मधील संपूर्ण परिसर पिंजून काढला. प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन या उमेदवारांनी डोअर टू डोअर प्रचार केला आहे. नागराध्यक्ष पदाचे उमेदवार भावनाताई घाणेकर, नगरसेवक पदाचे उमेदवार ओमकार विजय घरत, कमल अशोक पाटील, लता शेखर पाटील हे उमेदवार स्वच्छ, चारित्र्य संपन्न, उत्तम नेतृत्व व जनतेच्या उपयोगी पडणारे नेतृत्व आहे. याचा प्रत्यय निवडणुकीच्या प्रचारात सर्वांना येत आहे. जनतेत मिळून मिसळून राहणारे हे उमेदवार असल्याने जनतेचा, नागरिकांचा या उमेदवारांना प्रचारा दरम्यान चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान जनतेने, नागरिकांनी या उमेदवारांचे कौतुक करत शुभेच्छाही दिल्या आहेत. जनतेत सर्वत्र एकच चर्चा आहे.भावनाताई घाणेकर, ओमकार विजय घरत, कमल अशोक पाटील, लता शेखर पाटील हेच बहुमताने निवडून येतील अशी चर्चा सर्वत्र चालू आहे.