नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये सासरच्या मानसिक त्रासाला आणि छळाला कंटाळून विवाहित महिलांच्या आत्महत्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. नाशिकच्या हिरावाडी परिसरात एका नववाहितेने लग्नाला केवळ 6 महिने झाले असताना, विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत महिलेचं नाव नेहा पवार असून तिच्या सासरची मंडळी तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पती, सासू आणि नणंदेकडून होत असलेल्या मानसिक छळाला वैतागून महिलेने आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी पीडितेने सुसाईड नोटसुद्धा लिहिली असून त्यामध्ये तिने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सासरकडून सातत्याने होणारा मानसिक छळ, चारित्र्यावर संशय, पतीचे अनैतिक संबंध आणि आर्थिक मागण्यांमुळे त्रस्त झालेल्या २७ वर्षीय नवविवाहितेने विषप्राशन करून आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या हिरावाडी परिसरात घडली आहे. नेहा संतोष पवार असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
टोकाचं पाऊल उचलण्याआधी पोलिसांना उद्देशून ‘सुसाइड नोट’ लिहिली
सासरच्यांवर छळाचा आरोप करणारी सहा पानांची ‘सुसाइड नोट’ लिहून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे, नेहा संतोष पवार (वय २७, रा. हिरावाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम पंचवटी पोलिसांत सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी दि. २६) दुपारी एक वाजताच्या सुमारास नेहा पवारने राहत्या घरी विषारी औषधाचे सेवन केले, माहिती मिळताच पतीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पावणेपाच वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित करून पोलिसांना कळवले. नेहा पवारने हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी पोलिसांना उद्देशून ‘सुसाइड नोट’ लिहिली आहे.
‘सुसाइड नोट’मध्ये काय?
‘माझे नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार असून, माझे लग्न ४ जून २०२५ रोजी रेशीमबंध बँक्वेट हॉलमध्ये झाले. १० मार्चला सुपारी फोडल्यावेळी माझ्या सासरच्यांनी म्हटले की, हुंडाप्रथा बंद आहे. तरी तुम्ही नवरदेवास त्याच्या अटी-शर्तीनुसार सोने, चांदी, पाच भांडे द्या. त्यानुसार माझ्या माहेरच्यांनी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. लग्नानंतर सासरचे भांडण करीत नाही पण, मानसिक त्रास देतात.’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.
नेहा पवारने 7 पानांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. यामध्ये लग्न झाल्यानंतर नवऱ्याने शारिरीक संबंधानंतर सील ब्लड निघाले नाही, म्हणून 15-20 दिवस संशय घेतला. मात्र नंतर सील ब्लड निघाले तेव्हा तो शांत झाला, असा आरोपही नेहाने सुसाईट नोटमध्ये केला आहे. 6 सप्टेंबर 2025 रोजी मासिक पाळी आली होती. पण माझ्या सासूला शंका आली की खोटं बोलते, म्हणून माझ्या नंदेला सासून सांगितले की, तिला पॅड लावून तापसून बघ...यानंतर नंदेनेही मला खरंच पॅड लावून तपासले. इतकेच नव्हे तर माझ्या नवऱ्याने देखील पाळी आली की नाही, तपासल्याचं नेहा पवारने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
‘मोबाइलवर सारखी बोलते, घरकाम येत नाही, पतीला उलटसुलट सांगते. सिलिंडर टाकी एक महिन्यातच संपते. पतीचे लग्नाआधीपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध असून, पतीने तिला दोघांचे अश्लील फोटो दाखवले होते. सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि सासरचे लोक पैशांची मागणी करू लागल्याने माहेरहून २० हजार रुपये आणून दिले. दिवाळीसाठी १५ दिवस माहेरी पाठवले. मात्र, दहाव्या दिवशी सासू व पतीने सासरी येण्यास सांगितले. नियमित मासिक पाळी येत नसल्याने सासरच्या लोकांनी त्रास दिला. भाऊ सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून सगळ्यांना पाठवत आहे. माझे नशीब खराब असून, मला सासर चांगले मिळाले नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे’, असेही तिने चिठ्ठीत लिहिले आहे.
लग्नानंतर सुरू झाला छळ
नेहाचे लग्न ४ जून २०२५ रोजी झाले होते. हुंडा नको असे सांगूनही सासरकडून सोने, चांदी आणि इतर वस्तूंची मागणी करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.लग्नानंतर तिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेतला जात असल्याचे नेहाने चिठ्ठीत स्पष्ट केले आहे. “सील ब्लड निघाले नाही म्हणून पंधरा-वीस दिवस मला वारंवार शंका घेऊन त्रास दिला,” असे तिने नमूद केले आहे.
पतीचे अनैतिक संबंध, अश्लील फोटो दाखवून त्रास
सुसाईड नोटमध्ये पतीचे लग्नाआधीपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याचेही नेहाने लिहिले आहे. पतीने त्या युवतीसोबतचे अश्लील फोटो स्वतः तिला दाखवून मानसिक त्रास दिल्याचा उल्लेखही तिने केला आहे.
स्त्रीच्या सन्मानाला तडा देणारे आरोप
६ सप्टेंबरला मासिक पाळी आल्याचे सांगितल्यानंतरही सासूने आणि नणंदेने प्रत्यक्ष तपासण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आरोप नेहाने केला आहे. इतकेच नव्हे, पतीने देखील पाळी आली का हे तपासले, असे तिने लिहिले आहे.
आर्थिक मागण्या आणि सततचा तणाव
सासरची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असल्याने २० हजार रुपये माहेरातून आणून दिले, तर लग्नासाठी तिच्या भावाने १५ लाख रुपये खर्च केले होते, असा उल्लेख नोटमध्ये आहे. दिवाळीला माहेरी पाठवून दहाव्या दिवशीच परत सासरी बोलावण्यात आल्याचेही तीने लिहले आहे.
‘छळ सहन होत नाही, म्हणून आत्महत्या’ — नेहाची शेवटची शब्द
“माझ्या सासरच्यांनी माझी फसवणूक केली. सतत संशय, अपमान आणि मानसिक त्रास सहन होत नाही. ही चिठ्ठी सापडली तर ते पुरावे नष्ट करतील, म्हणून फोटो काढून सर्वांना पाठवत आहे. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, म्हणून मी आत्महत्या करत आहे,” असे नेहाने लिहिले आहे.
पोलिसांची पुढील तपास प्रक्रिया सुरू
घटनास्थळी सापडलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली असून, नेहाच्या सुसाईड नोटच्या आधारे सासरच्या लोकांवर संबंधित गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.