मंचर (जि. पुणे) — पुण्याच्या मंचरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. मंचर नगरपंचायत काबीज करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे, त्यांचा सामना हा शिंदेंच्या शिवसेनेशी आहे. आज अजित पवाराच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे वारंवार चर्चेत येणारे अजित पवार आज पुन्हा आपल्या एका प्रश्नामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलेत. अजित पवारांनी थेट महिला उमेदवाराला मंचावर लव्ह मॅरेज झालंय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवारांनी मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना लव्ह मॅरेज झालंय का? असा प्रश्न विचारला. सासर आणि माहेर एकाच गावात आहे, म्हणून हा प्रश्न विचारल्याचं स्पष्टीकरणही अजितदादांनी दिलं आहे.
लव्ह मॅरेज झालंय का काय? काय म्हणाले अजित पवार?
मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले पुर्वीच्या मोनिका बेंड, हा तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे, मोनिकाताईंचं माहेर पण इथेच आहे आणि सासरपण इथेच आहे, बरोबर आहे ना? मग लव्ह मॅरेज आहे का काय? यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला, यावेळी पुढे अजित पवार म्हणाले, सासर माहेर जवळ असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, असंही अजित पवारांनी पुढे म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा त्यांच्या मिश्कील शैलीमुळे चर्चेत आले आहेत. मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना थेट प्रश्न केला— “लव्ह मॅरेज झालंय का काय?”
हेमाहेर-सासर एकाच गावात, म्हणून प्रश्न — अजित पवार
मोनिका बाणखेले यांचं माहेर आणि सासर दोन्ही मंचरमध्ये असल्याच्या उल्लेखानंतर अजित पवार म्हणाले,“हा तुमचा उमेदवार फार फायदेशीर… माहेर आणि सासर दोन्ही एकाच गावात. मग लव्ह मॅरेज आहे का काय?”यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पवारांनी पुढे स्पष्ट करत, “वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही” असंही जोडून म्हणाले.
भाजप जिल्हाध्यक्षांना मिश्कील चिमटा
सभेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची ओळख ‘पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी’ अशी करून द्यायला लावून अजित पवारांनी हसतमुखाने त्यांना चिमटा काढला.माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘उपमुख्यमंत्री पवार बोलतील’ असं म्हणत भाषण संपवले असताना, अजितदादांनी “अहो, आधी जिल्हाध्यक्षांनाच सांगा बोलायला” असं सांगत सुरुवातीला त्यांनाच बोलावलं.
मंचर पाणी योजनेसाठी 136 कोटींची घोषणा
मंचरच्या पाणी प्रश्नावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले:“135 कोटींची मंजुरी लागेल.”मागून आलेल्या चिठ्ठीत आकडा 136 कोटी असल्याचे समजताच ते म्हणाले,“अरे, मी एक कोटी कमी बोललो! पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील तसं 136 कोटी मंजूर.”आणि मग मिश्कीलपणे जोडले “आता उद्या बातमी होईल की मी प्रलोभन दाखवलं!”
एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
भाषणात विकासकामांची चर्चा करताना अजित पवारांनी महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव जाणीवपूर्वक न घेता इतर नेत्यांची नावे घेतली. शिंदे यांच्या शिवसेनेविरुद्धच भाजप-राष्ट्रवादी (अजित गट) युती स्पर्धा करत असल्याने हा राजकीय संदेश मानला जातो.
बिबट्या प्रश्नावर सरकारची धडपड
जुन्नर, खेड, मंचर परिसरात वाढत्या बिबट्या संख्येवर बोलताना पवार म्हणाले:“एकदा मानवाच्या रक्ताची चव लागली की बिबट्या धोकादायक ठरतो. गोळीबाराची परवानगी घेतली आहे.”बिबट्यांना गुजरातला पाठवण्याच्या योजनेवर त्यांनी सांगितलं की, “गुजरात 50 पेक्षा जास्त बिबटे घेणार नाहीत.”1200 बिबट्यांच्या समस्येवर उपाय म्हणून नसबंदी निर्णय घेतला असला तरी, “हल्ला तर होणारच ना?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.