पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरुच आहे. नवले ब्रीजवरील भीषण अपघाताच्या घटनेला काही आठवडेच उलटले आहेत. अजूनही या घटनेच्या जखमा ताज्या आहेत.पुण्यातील येरवडा येथील गोल्फ क्लब उड्डाण पुलावर काल (गुरूवारी,ता २७) उशिरा रात्री अपघात झाला.आठ ते दहा गाड्यानी एकमेकांना धडक दिली.या अपघातात गाड्यांचं मोठं नुकसान झालं. काही काळ या उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाली होती.वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवण्यात आले.काही लोक किरकोकाल पुण्यातील येरवडा परिसरातील गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या..
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील गोल्फ क्लब उड्डाण पुलाजवळ हा अपघात झाला आहे. यावेळी सात ते आठ गाड्यांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. या अपघातात गाड्यांचा मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे काही काळ या उड्डाण पुलावर वाहतूक कोंडीही बघायला मिळाली. मात्र, येरवडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत केली .
सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसरातील नागरिकांनी अपघातातील गाड्या बाजूला केल्या सगळ्यांना मदत केली.