उरण : उरणचे आमदार महेश बालदी व शहराध्यक्ष कौशिक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषदेच्या भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह व सर्वच नगरसेवकांनी प्रचारात आघाडी घेतली असून ३ डिसेंबर २०२५ रोजी निकालाच्या दिवशी गुलाल आम्हीच उधळणार असा आत्मविश्वास पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष व सर्वच नगरसेवक उमेदवारांना जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक ६ व ७ च्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनाही जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक मताने, भरघोस मताने निवडून या असा आशीर्वाद जनतेनी या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना दिला आहे.भाजप महायुतीचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक निवडून यावेत यासाठी भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
प्रभाग क्रमांक ६ अ च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार स्नेहल कासारे-पाटील यांनी आजपर्यंत अनेक विकासकामे केली आहेत.स्नेहल कासारे पाटील या उरणच्या माजी नगरसेविका आहेत. उच्चशिक्षित पदवीधर शिक्षिका असून आपल्या कार्यकाळात त्यांनी महिला-बालकल्याण सभापती हे पद भूषविले. या काळात त्यांनी अनेक उपक्रम राबवून गरजू महिलांना स्वावलंबनाचा नवीन मार्ग दाखवला.
रीना निलेश पाटील या महिला सामाजिक कार्यकर्त्या असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. रीना निलेश पाटील त्यांचे पती निलेश मधुकर पाटील (जयहरी) यांच्या समाजसेवेचा वारसा जपत जनतेच्या सेवा कार्यासाठी सातत्याने पुढाकार घेत असतात. कोरोना लसीकरण, आधार कार्ड कॅम्प, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी असे विविध सामूहिक आणि सामाजिक उपक्रम त्यांनी पार पाडले आहेत. विश्वास, पारदर्शकता आणि विकास हि त्रिसूत्री निश्चित करूनच समाजसेवेचे हे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी त्या प्रभाग क्रमांक ६ ब मधून नगरसेविका म्हणून त्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत
प्रभाग क्रमांक ७ अ चे उमेदवार शाहिस्ता इब्राहिम कादरी या शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.शाहीस्ता इब्राहिम कादरी या उच्च शिक्षित असून स्वतः एक शिक्षिका आहेत, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलेले आहे. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत असलेला सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे. एक अनुभवी समाजसेवक म्हणून त्या प्रभाग ७ अ मधून नगरसेविका पदासाठी निवडणूकीला उभ्या आहेत.
प्रभाग क्रमांक ७ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार रवी यशवंत भोईर हे संपूर्ण उरण तालुक्याला सुपरिचित आहेत.रवी यशवंत भोईर - उरण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत, यासोबतच उपनगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून सुद्धा प्रदीर्घ राजकीय अनुभव त्यांना आहे. रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेक उपक्रमांमधून उरणच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान केले आहे.या सर्व उमेदवारांचे पारडे आता जड झाले आहे. अर्थातच विजय निश्चित मानला जात आहे.