सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप
 जिल्हा

राज्यपालांच्या हस्ते अनुपम खेर यांना डीएव्ही रत्न पुरस्कार प्रदान

डिजिटल पुणे    01-12-2025 10:41:52

मुंबई  – शिमला येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते डीएव्ही रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते डीएव्ही व्यवस्थापन समितीतर्फे संस्थेच्या प्रथितयश माजी विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. राज्यपालांनी यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रांच्या माध्यमातून देशाला योगदान देत असल्याबद्दल त्यांना कौतुकाची थाप दिली.

शिमला येथील डीएव्ही पब्लिक स्कूल येथे आपण पहिली ते अकरावी इतकी वर्षे शिक्षण घेतले. या संस्थेने आपल्याला भारतीय मूल्ये तसेच देश भक्तीचे संस्कार दिले, असे सांगताना आपल्या जीवनात डीएव्ही पब्लिक स्कूलचे महत्व अनन्य साधारण असल्याचे अनुपम खेर यांनी सांगितले. त्या काळातले शिक्षक विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा द्यायचे, परंतु ते प्रेम व संस्कार देखील द्यायचे असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी, डीएव्ही कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनम सुरी, डीएव्हीच्या संचालिका डॉ. निशा पेशीन तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती