सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप
 क्राईम

पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह! कल्याणीनगरमध्ये भीषण अपघात; व्हॅले पार्किंग असिस्टंटचा जागीच मृत्यू,मद्यधुंद चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

डिजिटल पुणे    01-12-2025 11:21:35

पुणे  :कल्याणी नगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणाच्या जखमा पुणेकरांच्या मनात ताज्या आहेत. तरी सुद्धा पुण्यात मद्यधुंद अवस्थेत कार चालवून अपघातांना निमंत्रण देण्याचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान आज पुन्हा एकदा कल्याणीनगरमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार समोर आला आहे. कल्याणीनगर येथील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या बाहेर रविवारी झालेल्या भीषण अपघातात व्हॅले पार्किंग असिस्टंटचा मृत्यू झाला.

कल्याणीनगरमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “टोईट” रेस्टॉरंटच्या बाहेर व्हॅले पार्किंग असिस्टंटला भरधाव कारने चिरडल्याची घटना दुपारी घडली.मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सत्येंद्र मंडल असे असून तो याच रेस्टॉरंटमध्ये व्हॅले पार्किंग असिस्टंट म्हणून काम करत होता. दुपारी साधारण ३.३० वाजता, प्रताप नावाचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी घेऊन पार्किंगमध्ये शिरला आणि काही कळायच्या आत वाहन थेट व्हॅले पार्किंग काउंटरवर धडकले. धडकेची तीव्रता इतकी होती की मंडल यांना जोरात उडून गंभीर दुखापत झाली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंडल यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दारूच्या नशेत धुंद असलेल्या चालकाला ताब्यात घेतलं. येरवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्हचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या वाढत्या प्रकरणांमुळे आता स्थानिकांमध्ये सुद्धा काळजी वाटू लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कल्याणीनगर भागातील "टोईट" रेस्टॉरंटच्या बाहेर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात व्हॅले पार्किंग असिस्टंटचा मृत्यू झाला आहे. व्हॅले पार्किंग काउंटरवर मद्यधुंद चालकाने गोंधळ देखील घातला. सत्येंद्र मंडल असे मृत्यू झालेल्या व्हॅले पार्किंग असिस्टंटचे नाव आहे. नशेत धुंद असलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रताप असे चालकाचे नाव आहे.

, पुण्यातील कल्याणीनगर भागात टोईट नावाचे एक रेस्टॉरंट आहे. दुपारच्या सुमारास मंडल हा याच रेस्टॉरंटमध्ये व्हॅले पार्किंग असिस्टंट म्हणून काम करतो. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वाहनाने या रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये एन्ट्री केली. काही समजायच्या आत हे वाहन थेट व्हॅले पार्किंग काउंटरवर जाऊन धडकले. या ठिकाणी असलेल्या मंडल याला सुद्धा या वाहनाने उडवलं.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंडल याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला पण यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दारूच्या नशेत असलेल्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. येरवडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेमुळे कल्याणीनगर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांनी रात्रीच्या वेळी होत असलेल्या बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे इत्यादी कलमांखाली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती