पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'सुनो भाई साधो ' : या कबीर पद गान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संत कबीर यांच्या रचनांचे गायन ,निवेदनासहीत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.कविता खरवंडीकर आणि श्रुती खरवंडीकर गायन सादर करणार आहेत.संगीत धनंजय खरवंडीकर यांचे आहे. हार्मोनियमवर उदय कुलकर्णी आणि तबल्यावर धनंजय खरवंडीकर साथसंगत करणार आहेत.सुनील देवधर हे निवेदन करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार,दि.६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे. कार्यक्रम विनामुल्य असून भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा २६७ वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.