सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लोकांमध्ये जाऊ नको, दीड-दोन महिने आराम कर, राज ठाकरेंचा संजय राऊतांना 'प्रेमळ दम'
  • एमपीएससी परीक्षा अन् निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी होणार? जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार, विद्यार्थीही संभ्रमात
  • राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
  • जय पवार–ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी खास ‘वऱ्हाड’ बहरीनला; केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण, राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित
  • कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
 जिल्हा

‘शूटिंग स्टार्स २०२५’ सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे ५ डिसेंबर रोजी आयोजन

डिजिटल पुणे    03-12-2025 14:13:37

मुंबई : ‘शूटिंग स्टार्स 2025’ हा सेलिब्रिटी फुटबॉल सामना मुंबई येथे 5 डिसेंबर 2025 रोजी  आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत. हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या प्रोजेक्ट महा-देवच्या अंतर्गत आयोजित केला जात आहे.प्रोजेक्ट महा- देव हा महाराष्ट्रातील U-13 वयोगटासाठीचा पहिलाच असा राज्यस्तरीय उपक्रम आहे, ज्याचा उ‌द्देश भारतीय संघासाठी भविष्याचे उत्तम फुटबॉलपटू तयार करणे हा आहे. 2034 च्या FIFA विश्वचषकासाठी भारताच्या संघात किमान पाच खेळाडू महाराष्ट्रातून असावेत, हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

या उपक्रमाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. टॅलेंट आयडेंटिफिकेशन (प्रतिभा शोध): ग्रामीण आणि शहरी भागातील लहान खेळाडूंना शोधून त्यांना संधी देणे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षणः वैज्ञानिक कोचिंग, फिटनेस, मानसिक आधार, तांत्रिक प्रशिक्षण अशा सर्व सुविधा देणे. दीर्घकालीन खेळाडू विकासः शिक्षण, पोषण, मार्गदर्शन, आणि निवासी प्रशिक्षणाच्या मदतीने मुलांचा सर्वांगीण विकास करणे.

हा उपक्रम क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. मणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने राबवला जात आहे.या बहुपदरी निवड प्रक्रियेत गावपातळीवरून 10,000 हून अधिक U-13 मुले आणि मुलींनी सहभाग घेतला होता. त्यातून 120 खेळाडूंनी राज्यस्तरीय अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता यातील 60 मुलांची पाच वर्षांच्या निवासी शिष्यवृतीसाठी निवड होणार आहे. या शिष्यवृत्तीत उच्च दर्जाचे प्रशिक्षण, शिक्षण, पोषण आणि 14 डिसेंबर रोजी लिओनेल मेसी यांच्या खास फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.‘शूटिंग स्टार्स 2025’ हा सामना या सर्व तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा देणार असून, महाराष्ट्राच्या तळागाळातील फुटबॉल व्यवस्थेच्या भक्कम बांधणीसाठी राज्याची बांधिलकी अधोरेखित करणारा आहे.


 Give Feedback



 जाहिराती