सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
  • लोकांमध्ये जाऊ नको, दीड-दोन महिने आराम कर, राज ठाकरेंचा संजय राऊतांना 'प्रेमळ दम'
  • एमपीएससी परीक्षा अन् निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी होणार? जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार, विद्यार्थीही संभ्रमात
  • राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची खमकी भूमिका
  • जय पवार–ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी खास ‘वऱ्हाड’ बहरीनला; केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण, राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित
  • कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
 जिल्हा

समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    03-12-2025 16:43:51

मुंबई : महाराष्ट्रातील समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.‘सुराणा यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचा वसा जपला. त्यांनी राजकीय क्षेत्रातही आदर्शवाद जोपासला. शेती, शेतकरी यांच्यासह पर्यावरण रक्षण, जलसंधारण यांच्यासाठी ते अखेरपर्यंत व्रतस्थपणे कार्यरत राहीले. नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ बालगृह व शाळेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो अनाथ मुलांच्या आयुष्यात नवसंजीवनी आणली. त्यांची निस्पृह आणि आदर्श अशी जीवनशैली समाजकारण – राजकारणातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांचे निधन महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारण क्षेत्राची हानी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुराणा यांचे कुटुंबीय तसेच कार्यकर्ते यांच्याप्रती संवेदना व्यक्त केली आहे. आपण या सर्वांच्या दुःखात सहभागी असल्याचे नमूद केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती