सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
  • भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य
  • नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
 जिल्हा

अत्याचारग्रस्तांच्या वारसांनी नोकरीसाठी १० डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

डिजिटल पुणे    05-12-2025 18:21:16

मुंबई  : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या २० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ (सुधारीत अधिनियम, २०१५) अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचारामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील अशा प्रकरणांतील पात्र वारसांनी १० डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावे,असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर,नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती