सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची, एक दिवसासाठी मुंबईत रिक्षा सोडण्याची मागणी
  • मोठी बातमी: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांची माहिती, प्रशांत जगतापांशी सखोल चर्चा
  • पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
  • अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न,
  • प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन ‘राष्ट्रवादी’ वेगळेच; शरद पवारांचा महत्त्वाचा निर्णय

डिजिटल पुणे    06-12-2025 12:46:08

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार नाहीत, असा मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने घेतला आहे. आज शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली.जगताप यांच्या मते, शरद पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की निवडणूक महाविकास आघाडीच्या नावानेच लढवली जाईल. त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या” चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

शरद पवारांशी सखोल चर्चा — पुणे राजकारणाचा लेखाजोखा सादर

प्रशांत जगताप म्हणाले की,“आज शरद पवारांची वेळ मिळाली. पुणे महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली. महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल, इतरांशी युती केली तर काय, या सर्वांचा अहवाल त्यांच्या समोर मांडला.”या भेटीत शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी पुणे महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या स्वरूपातच लढवण्याचा निर्णय पुन्हा एकदा स्पष्ट केला.“पक्षाचा वेगळा विचार नाही; निर्णय शशिकांत शिंदे जाहीर करतील”जगताप पुढे म्हणाले “आम्ही सर्वांची मते शरद पवारांसमोर ठेवली. पक्षाचा काहीही वेगळा विचार नाही. निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. हा निर्णय शशिकांत शिंदे अधिकृतपणे जाहीर करतील.”तर पुढे जगताप म्हणाले, सगळ्यांची मते शरद पवारांसमोर मांडली आहेत. शरद पवारांचा किंवा पक्षाचा वेगळा विचार नाही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ, शशिकांत शिंदे हा निर्णय जाहीर करतील. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवू, असंही जगताप पुढे म्हणालेत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम

राज्यात अनेक ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते एकत्र निवडणुकीला सामोरे जाताना दिसले होते. त्यामुळे पुण्यातही अशाच समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात होती.परंतु प्रशांत जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच ठाम भूमिका घेतली होती.“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन.”आजच्या बैठकीनंतर या सर्व तर्क–वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे आणि पुण्यातील निवडणूक महाविकास आघाडीच्या चौकटीतच लढवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय समीकरणे तयार होताना दिसून आली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचंही दिसून आलं. अशीच समीकरणे येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळू शकतात. मात्र, या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप  यांनी काही दिवसांपूर्वी ठाम विरोध दर्शवला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा पवित्रा त्यांनी घेतला होता, त्यानंतर आज प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली यावेळी मोठा हा मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती