सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची, एक दिवसासाठी मुंबईत रिक्षा सोडण्याची मागणी
  • मोठी बातमी: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांची माहिती, प्रशांत जगतापांशी सखोल चर्चा
  • पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
  • अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न,
  • प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
 विश्लेषण

पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातू किआनचा गालगुच्चा; लग्नसोहळ्यात घडला दिलखुलास प्रसंग

डिजिटल पुणे    06-12-2025 16:33:59

मुंबई : दिल्लीतील एका लग्नसोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले असता त्या ठिकाणी राज ठाकरेंचा नातू किआन ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित होते. मोदींनी अमित ठाकरेंसोबत संवादही साधला. दिल्लीतील एका भव्य लग्नसोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबातील एक दिलखुलास क्षण पाहायला मिळाला. अमित ठाकरे यांचा मुलगा आणि राज ठाकरे यांचा नातू किआन ठाकरे हा देखील या कार्यक्रमात उपस्थित होता. पंतप्रधान मोदी स्टेजवर फोटोसेशनसाठी उभे असताना अमित ठाकरे किआनला घेऊन त्यांच्या जवळ गेले. तेव्हा मोदींनी हसत-खेळत किआनचे गाल ओढत त्याच्याशी आपुलकी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहान बालकांशी किती आपुलकीने वागतात हे अनेकदा दिसून आलं आहे. लहानग्यांशी वागताना ते त्यांच्यापैकीच एक होऊन जातात आणि धम्माल करतात. असाच प्रसंग दिल्लीतील एका लग्नसोहळ्यात घडल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणे हा क्षणही उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.यावेळी तो लहान मुलगा मात्र दुसरा तिसरा कुणी नसून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू किआन ठाकरे होता. किआनचे गालगुच्चे घेतल्यानंतर मोदींनी अमित ठाकरेंसोबत छोटेखानी संवाद साधला आणि तीनहीजणांनी स्टेजवर एकत्र फोटोसेशनही केलं.

अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचे डॉ. राहुल बोरुडे यांचा लग्नसोहळा 5 डिसेंबर रोजी दिल्ली येथे पार पडला. या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तसेच या लग्नकार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी देखील उपस्थित होती.

मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांच्या लग्नसोहळ्यासाठी नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधान स्टेजवर गेले असताना फोटोसेशन सुरू होते. त्यावेळी खालून अमित ठाकरे हे त्यांच्या मुलाला घेऊन स्टेजवर गेले. अमित ठाकरे पंतप्रधानांच्या जवळ जाताच त्यांनी किआन ठाकरे याचे गाल ओढले. त्यानंतर अमित ठाकरे हे किआनसोबत मोदींच्या बाजूला उभे राहिले आणि पुन्हा फोटोसेशन पार पडलं.


 Give Feedback



 जाहिराती