पुणे: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संविधान ग्रुप च्या वतीने डॉ. आंबेडकरांचे विचार असलेली ५ हजार पुस्तके वाटून प्रसार करण्यात आला.डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वाटपावेळी संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल,संविधान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राकेश सोनवणे,महाराष्ट्र संविधान ग्रुपचे शहराध्यक्ष गणेश लांडगे,उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे,महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख प्रवीण सोनवणे ,जिल्हा संघटक विवेक माडेकर, शहर उपाध्यक्ष सागर अडगळे, म्हाळू-पार्वती प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश निकम व इतर त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते .त्याचबरोबर दलित पॅंथरचे राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी रक्तदान शिबिर भरवले .५०० भीमसैनिकांनी रक्तदान केले.उपस्थित सुवर्णा नडगम ,विशाल ओव्हाळ व दलित पॅंथर चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .