सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची, एक दिवसासाठी मुंबईत रिक्षा सोडण्याची मागणी
  • मोठी बातमी: पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांची माहिती, प्रशांत जगतापांशी सखोल चर्चा
  • पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
  • अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न,
  • प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
 जिल्हा

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

डिजिटल पुणे    06-12-2025 18:05:02

मुंबई  : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे. या चित्ररथाचे आज ६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात, प्रभादेवी मुंबई येथे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

हा चित्ररथ राज्यात विविध ठिकाणी फिरणार आहे. या चित्ररथामध्ये संविधानाची माहिती, संविधानाच्या मुलतत्त्वावरील माहिती, महत्त्वाची घडामोडी व लोकशाहीच्या मुल्यांवरील कलात्मक सादरीकरण व याबाबतचे प्रदर्शन बघायला मिळेल. या चित्ररथाद्वारे संविधान बाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. संविधानाची माहिती सर्वसामान्यांना माहित व्हावी, या उद्देशाने या चित्ररथाची निर्मिती करण्यात आलेली आहे.राज्यातील जास्तीत जास्त जनतेने या चित्ररथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती