सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
  • तपोवनातील झाडं वाचवायला सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक
 शहर

१४ डिसेंबर रोजी चमचमीत खानदेशी आणि वऱ्हाडी खाद्य मेळावा

डिजिटल पुणे    08-12-2025 16:12:12

पुणे : भ्रातृ मंडळ वारजे , पुणे आणि लेवा सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी खास खानदेशी तसेच वऱ्हाडी पाककृतींचा खाद्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सेंट क्रिस्पीयन्स होम (चर्च), रतनलाल सी. बाफना यांच्यासमोर, कृष्णा पर्ल्स शेजारी, कर्वे रस्ता, नळ  स्टॉप, पुणे येथे होणार असून खानदेशी,वऱ्हाडी पाककृतींचा स्वाद  एकाच ठिकाणी अनुभवण्याची ही उत्तम संधी आहे.संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांची आकर्षक मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे.

प्रवेश शुल्क ३० रुपये  आहे. कार्यक्रमात वांग्याचे भरीत, प्रसिद्ध खानदेशी चटण्या, मसालेदार मासे, गावरान कळण्याची भाकरी आणि अन्य अनेक घरगुती पदार्थ उपलब्ध असतील. कुटुंबांसाठी, खाद्यप्रेमींसाठी आणि प्रादेशिक पाककलेची आवड असणाऱ्यांसाठी हा मेळावा खास आकर्षण ठरणार आहे.आयोजकांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.          

 


 Give Feedback



 जाहिराती