पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘स्वरस्वप्न ' हा विशेष संगीत कार्यक्रम दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR), उपक्षेत्रीय कार्यालय, पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत केला जात आहे.स्वरस्वप्न ' या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन स्वप्ना दातार यांनी केले असून बंदिशी, सिने संगीत आणि रागरचनांच्या माध्यमातून सादर होणाऱ्या विविधरंगी सादरीकरणामुळे हा संगीतप्रेमींसाठी एक सुंदर अनुभव ठरणार आहे. भारतीय विद्या भवनच्या नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.