नागपूर : संत जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील विजयगड या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संत जगनाडे महाराज हे समाजप्रबोधनाचे ध्वजवाहक आणि संत परंपरेतील अढळ श्रद्धास्थान असणारे संत होते. समता, कार्य, भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालणारे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी समाजातील रूढीवाद, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला आणि भक्तीच्या माध्यमातून लोकांना जागृत केले. ‘काम हीच पूजा’ आणि ‘समाजहित हेच साधन’ ही त्यांची शिकवण जनतेला कर्मयोगाची प्रेरणा देणारी ठरली आहे. आजही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात संत जगनाडे महाराजांचे कार्य म्हणजे प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ आहे.