सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
  • तपोवनातील झाडं वाचवायला सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक
 राज्य

उरण- भेंडखळ येथे कंटेनर धडकेने युवकाचा जागीच मृत्यू, नागरिकांचा ‘रास्ता रोको’ आंदोलन

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    08-12-2025 18:38:10

उरण : ८ डिसेंबर २०२५ रोजी उरण तालुक्यातील नवघर‑खोपटा रस्त्यावर सोमवारी दुपारी १:३० वाजता भीषण अपघात झाला. भेंडखळ गावातील ३८‑वर्षीय अमोल काळूराम ठाकूर आपल्या मोटारसायकलवरून खोपटा गावाकडे जात असताना, बाँमण लाँडी यार्डजवळ असलेल्या कंटेनर ट्रेलर (एमएच 42 बीयू 5072) ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कंटेनरने अमोलला काही मीटर फरफटत नेले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, कंटेनर ट्रेलरला ताब्यात घेतले आणि रस्त्यावर ठिय्या मांडून ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी त्वरित पोलिसांना सूचना दिली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांशी संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.

अमोल ठाकूरच्या पार्श्वभूमीबद्दल सांगायचे झाले तर तो भेंडखळ गावाचा रहिवासी असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.तर उरण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास करून पोलीस यावर कठोर काय कारवाही करतील यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


 Give Feedback



 जाहिराती