सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
  • मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
  • स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
  • फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
  • उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
 जिल्हा

‘श्री संत संताजी’ गॅलरीचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन ;संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

डिजिटल पुणे    09-12-2025 15:41:07

नागपूर  : थोर संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगनाडे चौकातील संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ‘श्री संत संताजी’ आर्ट गॅलरीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.पूर्व नागपुरातील श्री संत जगनाडे चौक येथील कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, एमएसआयडीसीचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे आदी उपस्थित होते.

मानवता आणि लोककल्याणाची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे विचार, सेवा आणि समाज प्रबोधनाचा वारसा सदैव प्रेरणादायी आहे. ‘श्री संत संताजी’ आर्ट गॅलरीच्या माध्यमातून त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी स्मारक समितीचे डॉ. यशवंत खोब्रागडे, कैलास गायधने, डॉ. गुंजन देशमुख, विवेक साहू, माजी आमदार टेकचंद सावरकर, नरेंद्र बोरकर, नागपूर सुधार प्रन्यासचे प्रशांत भांडारकर, मनपाचे सहाय्यक आयुक्त विकास रायबोले, शुभम घाटे आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती