नागपूर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज हिंगणा बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. सोबतच महिलांचे हिरकणी कक्ष व बस स्थानकांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.प्रारंभी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रादेशिक व्यवस्थापक माधव कुसेकर, विभाग नियंत्रक विनोद चौरे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे, अभियंत्रचालक श्री. नेवारे, इमामवाडा आगार व्यवस्थापक इम्रान खान व नागरिक उपस्थित होते.