पुणे : महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (एमईडीसी) कडून 'एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५–२६' ही माहिती तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता, हेल्थकेअर व ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर या विषयावरील विशेष शिखर परिषद पुण्यात दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ , उद्योग तज्ञ, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर(जीसीसी )प्रतिनिधी, नवोन्मेषक,उद्योजक आणि धोरणनिर्माते यांना एकत्र आणून भविष्योन्मुख क्षमतावाढ आणि सहकार्याच्या संधींचा शोध घेणे हा या समिटचा मुख्य उद्देश आहे.
ताज विवांता(हिंजवडी,पुणे) येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत ही परिषद होणार असून समिटमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी खुली आहे. सहभागी होण्यासाठी स्टार्ट अप,नवउद्योजक,व्यावसायिकांनी नोंदणी करून आपली जागा निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणीसाठी ९३२२३५७५६७ या दूरध्वनीवर, [email protected] या ईमेलवर संपर्क साधता येईल.www.medcindia.com या संकेतस्थळावरून अधिक माहिती घेता येईल
*स्टार्ट अप,नवोन्मेषकांना एक व्यासपीठ*
महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आणि आयटी क्षमता क्षेत्राला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आयटी, एआय, हेल्थकेअर, संशोधन, स्टार्टअप्स, तसेच ग्लोबल डिलिव्हरी ऑपरेशन्स यामध्ये उदयास येणाऱ्या नवीन संधींचे दर्शन या समिटमध्ये घडणार आहे. महाराष्ट्राच्या नव्या जीसीसी पॉलिसी २०२५ च्या पार्श्वभूमीवर ४०० हून अधिक नवे केंद्र, गुंतवणूक वाढ आणि कौशल्याधिष्ठित रोजगार निर्मिती या गोष्टींचा विस्तार साध्य करण्यासाठी पुणे हे एक प्रमुख केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.लोकहितार्थ क्षमताविकास, ज्ञानविनिमय, सहयोग आणि कौशल्यवृद्धी यांवर आधारित उपक्रमांना चालना देण्यासाठी या समिटद्वारे उद्योग संस्था, सेवा प्रदाते, संशोधक आणि नवोन्मेषकांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.