सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाचा सर्व्हे आला समोर
  • पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
  • महाराष्ट्र-गुजरात सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त मोजणी सुरू
  • हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
 जिल्हा

गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांवर’मकोका’ लागू होणार ‘एफडीए’मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

डिजिटल पुणे    11-12-2025 12:22:09

मुंबई  :- गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात केली असून यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) कारवाईसाठी  बळकटी  येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री  नरहरी  झिरवाळ यांनी म्हटले आहे. याबद्दल मंत्री  झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

परराज्यातून अवैध मार्गाने राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी सुपारी आणली जाते. यावर ‘ एफडीए’च्या जप्ती आणि फौजदारी कारवाईनंतरही विक्री होत असल्याने या गुन्हेगारी साखळीला रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) अंतर्गत कारवाईचा निर्णय घेण्याची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पातळीवर सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मकोका कारवाई करण्याची घोषणा करून विभागाच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे, असे मंत्री झिरवाळ म्हणाले.

मकोका कारवाईची घोषणा करताना “गुटखा व अंमली पदार्थांवरील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर विशेष कायदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला जाईल,”असे मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ अधिवेशनात स्पष्ट केले.

गुटखा, सुगंधी पान मसाला यावर राज्यात बंदी असूनही शाळा महाविद्यालयांच्या व परिसरातील दुकानांत गुटखा उत्पादन व विक्रेत्यांकडून नियमबाह्य विक्री केली जाते. गुटखा विक्री कारवाई अधीक प्रभावी  व्हावी यासाठी  गुटख्यासह सुगंधी सुपारी विक्रेत्यांनाही मकोकाच्या कक्षेत आणले जाणार आहे, तसा प्रस्तावच विधि व न्याय विभागाला पाठवणार असल्याची माहिती या पूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी  दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती