सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
  • महाराष्ट्र-गुजरात सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त मोजणी सुरू
  • हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
 जिल्हा

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

डिजिटल पुणे    11-12-2025 17:19:52

नागपूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, तसेच योजनांच्या अंमलबजावणीस गती देण्यात यावी, असे निर्देश दिले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांचा आढावा मंत्री श्री. विखे पाटील यांनी नागपूर येथील विधान भवनातील त्यांच्या दालनात आयोजित बैठकीत नुकताच घेतला. या आढावा बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार, ॲड. राहुल कुल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख तसेच वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे उपस्थित होते.

या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजना, त्यांची अंमलबजावणी याचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. यावेळी सर्व संबंधितांना निर्देश देताना म्हणाले, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना व्यापक प्रचार-प्रसिद्धी मिळावी म्हणून जिल्हानिहाय व विभागनिहाय कार्यक्रम, मेळावे आणि माहितीपर उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात यावा. यामुळे लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती सहज पोहोचेल. तसेच महामंडळाचे संकेतस्थळ तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तत्काळ करावी, असे निर्देश त्यांनी दिले.


 Give Feedback



 जाहिराती