सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: मुंबईतील मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाचा सर्व्हे आला समोर
  • पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
  • महाराष्ट्र-गुजरात सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली; पालघरच्या तलासरीत गुजरातच्या घुसखोरीचा आरोप, दोन्ही राज्यांकडून संयुक्त मोजणी सुरू
  • हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
 जिल्हा

विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’च्या १९६४ वर्षापासूनच्या निवडक दुर्मिळ अंकांचे प्रदर्शन

डिजिटल पुणे    12-12-2025 15:36:00

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी  अधिवेशनानिमित्त महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’मासिकाचे प्रदर्शन विधिमंडळ परिसरात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात ‘श्री ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी’ ते ‘खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची’असे दुर्मिळ अंक आहेत.विधिमंडळ परिसरातील प्रदर्शनात 1964 पासूनचे निवडक दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध विशेषांकही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी ‘लोकराज्य’चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

यात महत्वाचे श्री ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, महात्मा जोतिराव फुले स्मृती शताब्दी विशेषांक, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर विशेषांक, मराठी संगीत रंगभूमी विशेषांक, छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक, मराठी भाषा विशेषांक, कोकण विशेष, विदर्भ विशेषांक, आदिवासी विशेषांक, खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची, संत परंपरा विषयक आदी विशेषांक आहेत.‘लोकराज्य’ मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असून त्यास सात दशकांची परंपरा लाभली आहे. हे मासिक राज्याच्या जडणघडणीचा साक्षीदार ठरले आहे. महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, माहितीपूर्ण विशेषांक विविध क्षेत्रातील माहितीचा खजिना म्हणून लोकराज्य ओळखले जाते. विश्वासार्ह माहितीमुळे हे मासिक सर्वसामान्य वाचकांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरले आहे.

चार हजारांवर नागरिकांनी दिली भेट

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या दालनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अमोल मिटकरी, आमदार भीमराव तापकीर, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विधिमंडळ परिसरात राज्यभरातून आलेल्या चार हजारांवर नागरिकांनी या प्रदर्शनीला आतापर्यंत भेट दिली आहे.

अंक ॲानलाईन उपलब्ध

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले लोकराज्य हे मासिक ऑनलाईन उपलब्ध आहे. http://dgipr.maharashtra.gov.in/lokrajya या संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपातील अंक वाचावयास मिळतील.


 Give Feedback



 जाहिराती