उरण : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे तसेच मनसेचे संस्थापक/अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भाई पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी राहिलेले रुपेश पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'रोजगार व स्वयंरोजगार' विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्रजी बैसाणे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्र देण्यात आले.
रुपेश पाटील यांचा परिचय जाणून घ्यायचा झाल्यास त्यांची मनसेतील कारकीर्द खूपच महत्वाची ठरते. पक्षाच्या स्थापनेपासून हा मनसेचा चर्चेत असलेला चेहरा आहे. पण कोरोना काळापासून रुपेश पाटील यांची ओळख जिल्ह्याबाहेर तसेच महाराष्ट्रात पोहोचली. कोरोना काळात त्यांनी गोरगरीब गरजू अशा हजारो लोकांची सेवा केली. गोरगरिबांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न यावर ते नेहमीच आवाज उठवत असतात. मराठी माणसावर जिथे कुठे अन्याय होताना दिसेल तिथे रुपेश पाटील सर्वात अगोदर मनसेचा दणका दाखवताना आपल्याला नेहमीच दिसतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन आज त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी देऊ केली आहे.
यावेळी महेंद्रजी बैसाने ( महाराष्ट्र अध्यक्ष, रोजगार रोजगार विभाग), सिद्धी आंगणे (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य),सोनी पी. बेबी (चिटणीस, महाराष्ट्र राज्य), संजय जाधव (माजी पोलीस अधिकारी), हिरामण जेधे, रोहित पाटील, विशू गिरी, ओमकार कचरे, पारस दरेकर, रोहन पाटील, निकेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.