पुणे : रॉयल डान्स अकॅडमी तर्फे आयोजित INDIA’S BIGGEST AWARD हा भव्य पुरस्कार सोहळा आज अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक (से.नि.) तथा शांतीदूत परिवाराचे मार्गदर्शक डॉ. विठ्ठल जाधव IPS यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


हा सन्मान शांतीदूत परिवाराच्या वतीने शांतीदूत सुरेश भाऊ सकपाळ, मधुकर चौधरी, जितीन सासतुरे, शिवराम मदने आणि नितीन दुधाटे यांनी स्वीकारला.कार्यक्रमात विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना डॉ. विठ्ठल जाधव IPS, तृप्ती देसाई, माधुरी जायभाये, नितीन झगरे, सौ. जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.या सोहळ्याला कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक रॉयल डान्स अकॅडमीच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

