सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल
  • मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
  • महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र
  • पिंपरीत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटणार, मनसे-काँग्रेस एकत्र, अजित पवारांनाही निमंत्रण धाडलं
  • अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
  • समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला
  • ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? संजय राऊतांनी मुहूर्त सांगितला, आजच राज ठाकरेंची भेट घेणार
 जिल्हा

प्रशासनाने लोकाभिमुख व पारदर्शकपणे कार्य करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

डिजिटल पुणे    16-12-2025 16:16:50

छत्रपती संभाजीनगर :  शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविताना त्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने लोकाभिमुख राहून पारदर्शकपणे कार्य करावे, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर विभागाची आढावा बैठक मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मुख्य सचिवांनी प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती घेतली. योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर करून कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना योजनांची माहिती सहज, सुलभ व स्थानिक भाषेत दिली जावी, तसेच त्यांच्या समस्या समजून घेऊन तातडीने निराकरण करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

योजना प्रभावीपणे राबविताना विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, प्रशासनाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण होणे गरजेचे असल्याचे मुख्य सचिव म्हणाले.शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून सेवा देताना पारदर्शकता, गती महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.

बैठकीत महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना जमिनीचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या बाबी, तसेच शासकीय सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. यासह प्रमुख पायाभूत प्रकल्प, विविध विभागांच्या मंजुरीअभावी प्रलंबित असलेले प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), मुख्यमंत्री कृषी सौर योजना, ग्रामीण भागातील उद्योगविकास, तसेच सातबारावरील खरेदी-विक्री व्यवहारांबाबतही मुख्य सचिवांनी सखोल आढावा घेतला.विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांची सद्यस्थिती, अंमलबजावणीतील प्रगती तसेच भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती