सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
  • : माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट निघाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज, अजित पवारांशी तातडीची चर्चा
  • मोठी बातमी : अजित पवार मुंबईत महायुतीतून बाहेर पडणार, आजच मोठा निर्णय घेणार?
  • बंडखोरी रोखण्यासाठी राज–उद्धव ठाकरे यांची ‘लास्ट मिनिट’ स्ट्रॅटेजी; उमेदवारांची नावं शेवटपर्यंत गुलदस्त्यात
  • माणिकराव कोकाटेंचं खातं कोणाला द्यायचं सांगा...; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना थेट प्रश्न,
  • 'उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील', पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
  • मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात, अजित पवारांच्या भेटीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
 जिल्हा

‘महापारेषण’ला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान

डिजिटल पुणे    17-12-2025 11:00:07

डेहराडून  : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण उत्तराखंड विधानसभेच्या अध्यक्ष रितू खंडुरी भूषण व माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले.

उत्तराखंडमधील डेहराडूनच्या हॉटेल एमरॉल्डमध्ये आयोजिलेल्या ४७ व्या भारतीय जनसंपर्क परिषदेच्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी `पीआरएसआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पीएलके मूर्ती, गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप गुप्ता, पद्मश्री डॉ. बी. व्ही. के. संजय यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

जनसंपर्क विभागाचे काम कौतुकास्पद : डॉ. संजीव कुमार

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी यशाचे श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तब्बल १४ राष्ट्रीय पुरस्कार व एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा महापारेषणचा जनसंपर्क विभाग अव्वल ठरला आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले.

 


 Give Feedback



 जाहिराती