महाराष्ट्र – महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार सर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. भारतीय शिल्पकलेला जागतिक उंचीवर नेणारे, साधेपणा, शिस्त आणि कलेप्रती अपार निष्ठा असलेले राम सुतार सर हे केवळ महान कलाकार नव्हते, तर भारताच्या शिल्पकलेचा जागतिक मान वाढवणारे, ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार सर यांचे दुःखद निधन झाले आहे. साधेपणा, शिस्त आणि कलाप्रती अपार निष्ठा असलेले राम सुतार सर हे केवळ महान कलाकार नव्हते, तर भारतीय संस्कृतीचे संवेदनशील द्रष्टे देखील होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नम्रता, सातत्य आणि कर्मयोगाचा सुंदर संगम दिसत असे.
स्वातंत्र्य चळवळीतील नेते, राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या भव्य पुतळ्यांतून त्यांनी इतिहासाला आकार दिला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या जगातील सर्वोच्च पुतळ्याच्या माध्यमातून भारताची शिल्पपरंपरा जागतिक पटलावर ठसठशीतपणे मांडण्याचं ऐतिहासिक कार्य त्यांनी केलं. त्यांच्या कलेत राष्ट्रभक्ती, प्रेरणा आणि कालातीत मूल्यांचा प्रत्यय येतो. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचं कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल.या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो !
मुरलीधर मोहोळ