सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला
  • माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक करणार? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी माहिती मागवली, घडामोडींना वेग
  • भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
  • पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे कोणाचं ऐकणार?
  • जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 DIGITAL PUNE NEWS

अनंतराव पवार महाविद्यालयात संविधान जागृती कार्यशाळा संपन्न

डिजिटल पुणे    18-12-2025 17:25:23

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट येथे एकदिवसीय ‘संविधान जागृती’ कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. भारतीय संविधानाची मूलभूत ओळख करून देणे, संविधानाची रचना, उद्देश, प्रस्तावना व महत्त्व स्पष्ट करणे, तसेच मूलभूत हक्क व कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. लोकशाही मूल्यांचे संवर्धन, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांची जाणीव वाढवणे, संविधानाबद्दल आदर व निष्ठा निर्माण करणे आणि संविधान हा राष्ट्राचा आधारस्तंभ आहे ही भावना दृढ करणे, या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. विजय बालघरे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अभय पाटील यांनी केले.

या कार्यशाळेत प्रा. सचिन पवार यांनी मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाचा ऐतिहासिक संदर्भ, त्याची निर्मिती प्रक्रिया, उद्दिष्टे, अपेक्षा, उपाययोजना व महत्त्व यांची सविस्तर माहिती दिली. संविधान हे त्यागाचे फलित असून महापुरुषांच्या विचारांचे मूर्त स्वरूप आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच संविधानातील विविध कलमे, मूलभूत हक्क व अधिकार याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. कृष्णा भांडलकर (राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अभय पाटील, प्रा. दिलीप सोनवणे, प्रा. मीनाली चव्हाण, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणून श्री. कृष्णा भांडलकर यांनी काम पाहिले व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.जी.लोबो यांनीही या प्रसंगी मार्गदर्शन केले.आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रत्यक्ष संविधान जगत आहेत असे ते म्हणाले.या प्रसंगी आलिजा शेख (एस.वाय. बी.कॉम), ऋत्विक सातव (एस.वाय. बी.ए.), सोनाली सरोदे (एस.वाय. बी.कॉम), दिव्या बोरसे (एम.एस्सी) व अभिषेक पाटील (एस.वाय. बी.कॉम) यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. ईश्वर हेमके यांनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख व प्रा. मीनल चव्हाण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सिद्धार्थ नवतुरे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. दिलीप सोनवणे यांनी केले. संविधानिक साक्षरता वाढवून जबाबदार व जागरूक नागरिक घडवण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.


 Give Feedback



 जाहिराती