सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला
  • माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक करणार? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी माहिती मागवली, घडामोडींना वेग
  • भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
  • पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे कोणाचं ऐकणार?
  • जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 व्यक्ती विशेष

रायगड जिल्ह्यात राजकीय भूकंप ! आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी व एकतर्फी कारभाराला कंटाळून शिवसेना(शिंदे गट )पक्षातील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    18-12-2025 17:31:03

उरण : उरण विधानसभा मतदार संघात गेले अनेक वर्षे काम करणाऱ्या शिवसेना(शिंदे गट )पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, त्यांची बाजू न ऐकता कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उरण विधानसभा मतदार संघात / कार्यक्षेत्रात प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून विनोद साबळे यांची नियुक्ती केली आहे.ही नियुक्ती कोणालाही विश्वासात न घेता केल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.त्यातच आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा व शिवसेना पक्ष वाढीला विरोध करून वारंवार मनमानी, एकतर्फी कारभार करत असल्याचा आरोप उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी व एकतर्फी कारभाराचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातील  अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले सामुहिक राजीनामे संजय मोरे - सचिव शिवसेना, बाळासाहेब भवन, मुंबई यांच्याकडे सुपूर्त केले आहेत.

उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर व पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील या पदाधिकाऱ्यांनी त्वरित आपले राजीनामे वरिष्ठाकडे सुपूर्त केले आहे.उरण व पनवेल तालुक्यातील दोन्ही तालुका प्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे वरिष्ठाकडे सुपूर्त केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षात असणाऱ्या व एकनिष्ठ प्रामाणिकपणे कोणताही स्वार्थ न बाळगता काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यावर होत असलेला अन्याय या घटनेतून समोर येत आहे.पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या  उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून बाजूला केल्याने पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असून ज्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले शिवसेनेचा विचार व कार्याचा तळागाळात प्रचार केला,प्रसार केला त्या जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून बाजूला केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामुहिक राजीनामे दिले असून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पद नियुक्ती होत असल्याने व त्याचा फटका पदाधिकारी कार्यकर्त्यांना बसत असल्याने होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहे.


 Give Feedback



 जाहिराती