उरण : विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी,विज्ञानाबाबत जनजागृती व्हावी या अनुषंगाने उरण पंचायत समितीने दिनांक १५-१२-२०२५ ते १७-१२-२०२५ ह्या कालावधी मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विदयालय, पिरकोन येथे उरण तालुका विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ तसेच विविध स्पर्धा जसे की निबंध, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा आयोजन केले होते. ह्या स्पर्धामध्ये एकूण २५ शाळा व कॉलेजने सहभाग घेतला होता. ज्यात उरणच्या यु. ई. एस. स्कूल व ज्यु. कॉलेजने एकूण ६ बक्षिसे मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.
विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी एसटीइएम ह्या विषयावर ज्यु. कॉलेज मधील कु. भार्गवी मंदार जाधव आणि एकूण १५ विदयार्थीनी तर उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि हरित उर्जा ह्या विषयांवर माध्यमिक विभागा मधील कु. साईराज सुरेश हरीमकर आणि एकूण ०९ विदयार्थीनी प्रकल्प तयार करुन प्रदर्शनात सहभाग घेतला होता.
विज्ञान प्रदर्शनात विदयार्थ्यांनी तर यश मिळवलेच पण शिक्षकांच्या प्रकल्पानेही प्रथम क्रमांक मिळविला. ह्या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणारे ज्यु. कॉलेजचे प्रतिक प्रशांत पाटील व कु. केतकी चंद्रविलास ठाकूर तर माध्यमिक विभागाच्या स्मिता अनिल पुजारी व कु. वैशाली मनोहर मेश्राम ह्यांचे व सर्व सहभागी विदयार्थ्यांचे यु. ई. एस. संस्थेचे कमिटी मेंबर्स व स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या व समन्वयक, माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका ह्यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ज्यु. कॉलेज प्रकल्प आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्पासाठी पात्र ठरला आहे व त्यातही यु. ई. एस. चे विदयार्थी व शिक्षक घवघवीत यश मिळवून कौतुकास पात्र ठरतील, ह्यात तिळमात्रही शंका नाही.
स्पर्धेतील निकाल
१. ज्यु. कॉलेज प्रकल्प - प्रथम क्रमांक
२. शिक्षक प्रकल्प प्रथम क्रमांक
३. वक्तृत्व स्पर्धा (ज्यु. कॉलेज) प्रथम क्रमांक
४. निबंध स्पर्धा (माध्यमिक विभाग) द्वितीय क्रमांक
५. प्रश्नमंजुषा स्पर्धा (ज्यु. कॉलेज) द्वितीय क्रमांक
६. प्रश्नमंजुषा स्पर्धा (माध्यमिक विभाग) तृतीय क्रमांक.
