सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, आमदारकी जाणार? याचिकाकर्ते आजच सर्वोच्च न्यायालयात जाणार
  • सावरी ड्रग्ज साठा प्रकरणी ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, एकनाथ शिंदेंना पदावरुन बाजूला करण्याची मागणी, कोयना धरणाजवळील 'रिसॉर्ट' बेकायदेशीर असल्याचा दावा
  • माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, मात्र आमदारकीला धोका कायम
  • 41व्या वर्षांची भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई; लिंबाचिया कुटुंबात चिमुकल्या पावलांनी गोड पाहुण्याचं आगमन
  • माणिकराव कोकाटेंसंदर्भात महत्वाची अपडेट, प्रकृती स्थिर असल्यास अटकेची शक्यता; वरिष्ठांशी सल्लामसलत करून नाशिक पोलिस निर्णय घेणार
  • माणिकराव कोकाटेंची प्रकृती बिघडली? अँजिओग्राफीसाठी नेलं, रुग्णालयात कोकटेंची मुलगी अन् पत्नी उपस्थित
 व्यक्ती विशेष

माणिकराव कोकाटेंबाबत मोठी अपडेट: प्रकृती स्थिर असल्यास अटकेची शक्यता; नाशिक पोलिस वरिष्ठांशी सल्लामसलत करणार

डिजिटल पुणे    19-12-2025 15:44:07

मुंबई : नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर अँजिओग्राफी करण्यात आली असून, त्यांच्या वैद्यकीय अहवालावर पुढील कायदेशीर कारवाई अवलंबून असणार आहे.

अँजिओग्राफी अहवालाची पोलिसांकडून मागणी

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाकडे अँजिओग्राफीचा सविस्तर वैद्यकीय अहवाल अधिकृतपणे मागवला आहे. अहवालात कोकाटेंची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाल्यास, आजच अटकेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मागील काही तासांपासून नाशिक पोलिसांची टीम रुग्णालयात तळ ठोकून असून, अहवाल मिळताच तो न्यायालयात सादर केला जाणार आहे.

सायंकाळी ४ वाजता मेडिकल बुलेटिन

लीलावती रुग्णालय प्रशासन आज दुपारी चार वाजता मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करून कोकाटेंच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देणार आहे. सध्या कोकाटे अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. रुग्णालयात त्यांची मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत. डॉक्टरांच्या प्राथमिक मतानुसार, कोकाटेंना पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असून, कोणताही मानसिक किंवा शारीरिक ताण टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उच्च न्यायालयात आज सुनावणी

दरम्यान, आज मुंबई उच्च न्यायालयात माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, उच्च न्यायालयातील सुनावणीचा थेट संबंध नाशिक मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटशी नाही. नाशिक मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दोषी ठरवत अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, उच्च न्यायालयाने या आदेशाबाबत स्थगिती देता येईल का, यावर निरीक्षण (टिप्पणी) नोंदवली असून, यामुळे कायदेशीर स्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

आजचा दिवस ठरणार निर्णायक

एकीकडे उच्च न्यायालयातील सुनावणी, दुसरीकडे वैद्यकीय अहवाल आणि तिसरीकडे अटक वॉरंटची अंमलबजावणी या तिन्ही बाबींमुळे माणिकराव कोकाटेंसाठी आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटेंची प्रकृती स्थिर असल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यास आणि वरिष्ठ पातळीवर सल्लामसलत झाल्यानंतर नाशिक पोलीस आजच अटकेचा निर्णय घेऊ शकतात. एकीकडे उच्च न्यायालयातील सुनावणी, दुसरीकडे वैद्यकीय अहवाल आणि तिसरीकडे अटक वॉरंटची अंमलबजावणी, यामुळे माणिकराव कोकाटेंसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती