नागपूर : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील अवाडा कंपनीत आज भीषण अपघात घडला. सौर पॅनल निर्मिती सुरू असताना पाण्याच्या टाकीचा टॉवर अचानक कोसळल्याने तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी परिसरात टाकीच्या शेजारी बांधकामाचे काम सुरू होते. यावेळी अचानक टाकीचा टॉवर कोसळला आणि काम करणारे मजूर मलब्याखाली दबले गेले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
जखमी मजुरांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही कामगार अद्याप मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात होती.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य राबवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण काय आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.या दुर्घटनेमुळे औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
.