पुणे : राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांत यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे तापमान थेट 4.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून, ही या मोसमातील आतापर्यंतची सर्वात कमी नोंद ठरली आहे. नाशिक शहरातही तापमान 6.9 अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरावर आज दाट धुक्याची चादर पसरली होती. शहराचा किमान तापमानाचा पारा 10 अंशांखाली घसरला असून मन आणि महेशा नद्यांच्या परिसरात धुक्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. ऐन मतदानाच्या दिवशी थंडी आणि आल्हाददायक वातावरणाचा अनुभव बाळापूरकरांनी घेतला.
कोरडे हवामान, कडाक्याची थंडी आणि धुके असे चित्र सध्या दिसून येत आहे. आज राज्यात नगर परिषदेसाठीची मदतान प्रक्रिया पार पडत आहे, थंडीचा काहीसा परिणाम मतदारांवर देखील पडल्याचं दिसून आलं. तर नाशिक आणि निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरला असून नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. या मोसमातील नीच्चांकी तापमानाची नोंद आज झाली आहे. नाशिकमध्ये 6.9 अंश तर निफाडमध्ये 4.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
बाळापूर शहरावर धुक्याची चादर
अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर पहायला मिळालीय. बाळापूर शहराचा आजचा पारा 10 अंशांखाली उतरलाय. शहरातील मन आणि महेशा या दोन्ही नद्यांवर धुक्यांची दाट चादर पसरली आहे. या धुक्यामुळे दृश्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत आहे. बाळापूरकरांनी ऐन मतदानाच्या दिवशी या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला आहे.(
पुणे परिसरातही थंडीची लाट
पुणे आणि परिसरात थंडीची लाट स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या 24 तासांत पुण्यात तापमान 8.3 अंशांपर्यंत घसरले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमान 8 अंशांपर्यंत आणि कमाल तापमान 29 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
पुण्यातील विविध भागांतील किमान तापमान पुढीलप्रमाणे नोंदवले गेले आहे –
पाषाण: 8 अंश
लोहगाव: 13 अंश
चिंचवड: 14 अंश
मगरपट्टा: 15 अंश
कोरेगाव पार्क: 13 अंश
मुंबई-कोकणातही गारठा कायम
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर गारठा कायम असून पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
पुढील अंदाज काय?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, किमान तापमानात पुढील 7 दिवस फारसा बदल होणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.