उरण : उरण तालुक्यातील विविध गावातून उरण तहसीलदार कार्यालयात नागरिक विविध शासकीय कामे उदा. जबाब पंचनामा, रेशनकार्ड, जमिनीची कामे आणि इतर विविध कामांसाठी येत जात असतात.त्या नागरिकांना तलाठी साठी उरण वरून जे.एन.पी. टी. टाऊनशिप येथे सात किलोमीटर अंतरापर्यंत विविध वाहनांनी जावे लागत आहे.परंतु जे एन पी टी टाऊनशिप मध्ये कधी कधी काही कारणास्तव तलाठी भेटत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे या कारणास्तव नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विषयावर अनेक तक्रारी वंचित बहुजन आघाडीचे उरण तालुका उपाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्याकडे प्राप्त झाले होते.आणि तो विषय, समस्या त्यांनी समजून घेतले. व ती समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
वंचित बहुजन आघाडी उरण तालुका उपाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांना पत्रव्यवहार करून सविस्तर चर्चा केली.लवकरच जेएनपीटी वरून पुन्हा उरण शहरात तलाठी कार्यालय सुरु करण्यात येणार असे तहसीलदार उद्धव कदम यांनी आश्वासन दिले. उरण तालुका मधील नागरिकांना त्रास होणार नाही दक्षता घेतली जाईल असे तहसीलदार उद्धव कदम यांनी आश्वासित केले.
मागील अनेक वर्षापासून तालाठी कार्यालय जेएनपीटी वसाहतीमध्ये हटविण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना विशेष करून जमिनीसंदर्भातील कामकाजासाठी येणाऱ्या वृद्ध नागरिकांना याचा अतोनात त्रास होत आहे. तर तलाठी कार्यालयात गेल्यावर अनेकदा तालाठी उपलब्ध नसतात. याबाबत विचारणा केल्यास आलेल्या नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जातात. अशा परिस्थितीमध्ये तलाठी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. मात्र यापेक्षा महत्वाचे म्हणजे मानसिक त्रास देखील होत आहे. यासाठी यावर तात्काळ तोडगा काढणे आता महत्वाचे झाले आहे.तलाठी कार्यालय उरण शहरात कार्यान्वित झाल्यास सर्वसामान्य नागरिक, आबालवृद्ध यांचे पैसा श्रम, वेळीची खूप मोठी बचत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही तलाठी कार्यालय उरण शहरात कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.