सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
  • मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
  • मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेलाही स्थगिती, सुप्रीम कोर्टाकडून सर्वोच्च न्याय!
  • मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
  • भाजप आमदार पराश शाहांनी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी, संजय राऊतांचा दावा, भाजपवर आगपाखड
 शहर

डी.ई.एस. पूर्व प्राथमिक शाळेत साहित्यिक संगम रंगला

डिजिटल पुणे    22-12-2025 12:47:46

पुणे :डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रोडवरील मुरलीधर लोहिया मातृमंदिर पूर्व प्राथमिक शाळेत नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. निमित्त होते ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे. टिळक रोड वरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावर्षीचा मुलांनी मी मराठी "उत्सव मराठीचा, संगम साहित्यिकांचा"  या विषयावर सादरीकरण केले. समृद्ध मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी, साहित्यिक जसे ग.दि.माडगूळकर, पु ल देशपांडे   कुसुमाग्रज पासून ते संदीप खरे पर्यंत वेगवेगळे साहित्यिकांच्या लेखनावर मुलांनी आपली कला सहज सादर केली.या कार्यक्रमात मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक व कवी ग.दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांच्यापासून ते समकालीन कवी संदीप खरे यांच्यापर्यंत विविध साहित्यिकांच्या लेखनावर आधारित कला विद्यार्थ्यांनी अत्यंत सहज आणि प्रभावीपणे सादर केली. लहानग्यांच्या सादरीकरणातून मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि साहित्याचा वारसा अनुभवायला मिळाला.

 

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ग्रंथदिंडीने करण्यात आली. यावेळी उत्साही पालकांनी ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भारावून टाकले. श्री. जगदाळे व श्री. रोहन शेंडकर यांनी शंखनाद करून दिंडीचे स्वागत केले. तसेच पदाधिकारी राजश्री ठकार, मिलिंद कांबळे व इतर शाळांच्या मुख्याध्यापिकांनी ग्रंथदिंडीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.

या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध रंगकर्मी श्री. योगेश सोमण उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध बालसाहित्यिक श्री. राजीव तांबे यांनी उपस्थिती लावली. यावेळी श्री. सोमण यांनी प्रत्येकाने कलेचा छंद जोपासावा आणि मुलांना त्यांचे बालपण मुक्तपणे जगू द्यावे, असा संदेश दिला. तर श्री. राजीव तांबे यांनी आपल्या भाषणातून बोधप्रद गोष्ट सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कलाकार श्री. अभिषेक खेडकर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण सोहळा आनंदी आणि उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ते प्रसिद्ध रंगकर्मी श्री योगेश सोमण तर विशेष उपस्थिती होती ती प्रसिद्ध बालसाहित्यिक श्री राजीव तांबे यांची. यावेळी श्री सोमण यांनी प्रत्येकाने कलेचा छंद जोपासवा. मुलांना बालपण मुक्तपणे जगू द्यावे असा संदेश दिला. तसेच राजीव तांबे यांनी आपल्या भाषणात बोधप्रद गोष्ट सांगून मार्गदर्शन केले.प्रसिद्ध कलाकार श्री.अभिषेक खेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण सोहळा आनंदी आणि उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडला.


 Give Feedback



 जाहिराती