सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
  • मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
  • मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेलाही स्थगिती, सुप्रीम कोर्टाकडून सर्वोच्च न्याय!
  • मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
  • भाजप आमदार पराश शाहांनी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी, संजय राऊतांचा दावा, भाजपवर आगपाखड
 DIGITAL PUNE NEWS

आत्महत्येचा बनाव उघड; सुपारी देऊन व्यावसायिकाची हत्या, दोन आरोपी अटकेत

डिजिटल पुणे    22-12-2025 15:25:20

जालना : जालन्यातील अंबड चौफुली परिसरात कारमध्ये आढळलेल्या व्यावसायिकाच्या मृतदेहामागील रहस्य अखेर उघडकीस आले असून, ही आत्महत्या नसून पैशाच्या वादातून केलेली थरारक सुपारी हत्या असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.शहरातील व्यावसायिक सागर धानोरे यांचा मृतदेह रविवारी सकाळी सहाच्या सुमारास एका कारमध्ये आढळून आला होता. मृतदेहाजवळ पिस्टल सापडल्याने सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी फॉरेन्सिक तपास, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही हत्या असल्याचे उघड केले.

व्यवसायिक हत्या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कमलेश झाडीवाले आणि कल्याण भोजने यांना अटक केली. दरम्यान, आरोपी कल्याण भोजने आणि मयत यांच्यात पैशाच्या व्यवहार होता, याच व्यवहारातून आरोपी कल्याण भोजने याने कमलेश झाडीवाले याला हत्येची सुपारी दिल्याचे समोर आलं आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपी कल्याण भोजने याच्या सांगण्यावरून आरोपी कमलेश झाडीवाले याने शहरातील आंबड चौफुली परिसरामध्ये मयताच्या कारमध्ये बसून त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्यामानेवरती पिस्टलमधून दोन राउंड फायर केले. तसेच धारदार शस्त्राने त्याच्यावरती वार करत त्याची हत्या देखील केली. दरम्यान संशयित आरोपी झाडीवाले कारमधून उतरतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर तपासाला वेग आला अन् या हत्याकांडाचे गुढ उलगडलं. 

पैशाच्या व्यवहारातून सुपारी हत्या

पोलिस तपासात मयत सागर धानोरे आणि आरोपी कल्याण भोजने यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद असल्याचे समोर आले. याच वादातून कल्याण भोजने याने कमलेश झाडीवाले याला धानोरे यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.शनिवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास, आरोपी कमलेश झाडीवाले याने मयताच्या कारमध्ये बसून त्याला बोलण्यात गुंतवले आणि त्याच्या मानेवर पिस्टलमधून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्याची निर्घृण हत्या केली.

सीसीटीव्हीमुळे उलगडले गूढ

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास करत पिस्टल, दोन मोबाईल आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी झाडीवाले हा मयताच्या कारमधून उतरताना स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले. यामुळे आत्महत्येचा बनाव पोलिसांच्या लक्षात आला आणि तपासाला निर्णायक कलाटणी मिळाली.

टोलनाक्यावर आरोपी अटकेत

हत्या करून संशय टाळण्यासाठी आरोपी झाडीवाले याने मयताच्या नातेवाईकांसोबत पोस्टमार्टमसाठी संभाजीनगरला जाण्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी त्याचा माग घेत संभाजीनगरहून परतताना जालना जवळील टोलनाक्यावर त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत सहआरोपी कल्याण भोजने याचे नाव उघड केले.या प्रकरणात आणखी आरोपी किंवा कटातील इतर कंगोरे आहेत का, याचा तपास सुरू असल्याची माहिती डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती