सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
  • मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
  • मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेलाही स्थगिती, सुप्रीम कोर्टाकडून सर्वोच्च न्याय!
  • मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
  • भाजप आमदार पराश शाहांनी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी, संजय राऊतांचा दावा, भाजपवर आगपाखड
 जिल्हा

पर्यावरण रक्षा –मानव सुरक्षा या विषयावर फॉन संस्थेतर्फे जनजागृती.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    22-12-2025 17:24:55

उरण : कोकण ज्ञानपीठ कला व वाणिज्य  महाविद्यालय , उरणच्या एनएसएस विभागाच्या श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे फ्रेंड्स ऑफ नेचर ( फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था,चिरनेर-उरण,रायगड( महाराष्ट्र ) तर्फे "पर्यावरण रक्षा –मानव सुरक्षा" या विषयावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  जयवंत रामदास ठाकूर व सदस्य राकेश सुरेश शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पर्यावरण व मानव–वन्यजीव  संघर्ष तसेच सर्प ओळख,सर्पदंश कसे टाळावे व सर्पदंश झाल्यास काय करावे ? संस्थेच्या शून्य सर्पदंश मृत्यू अभियान आणि स्नेक बाईट ऍकशन टीम (S.A.T) प्रकल्पाबद्दल जनजागृती केली.तसेच संस्थेचे सदस्य निकेतन रमेश ठाकूर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मानव –बिबट संघर्ष ,बिबटयाचे हल्ले वाढत आहेत त्याची कारणे व त्यावरील उपाययोजना याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दत्ता हिंगमिरे यांचीही यावेळी उपस्थिती लाभली होती.


 Give Feedback



 जाहिराती