सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु
  • मोठी बातमी : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
  • मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेलाही स्थगिती, सुप्रीम कोर्टाकडून सर्वोच्च न्याय!
  • मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
  • भाजप आमदार पराश शाहांनी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी, संजय राऊतांचा दावा, भाजपवर आगपाखड
 शहर

तिरुपती नागरी पतसंस्था आयोजित रक्तदान शिबिरात शतकवीर रक्तदात्यांचा सत्कार ;रक्तदान शिबिरात १००५ जणांचे रक्तदान

डिजिटल पुणे    22-12-2025 17:26:09

पुणे : तिरुपती नागरी सहकारी संस्था यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 'रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट' ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन २ हजार  रक्तदात्यांची उपस्थिती होती.त्यातील १००५ जणांनी रक्तदान केले.५० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या ४५  सभासदांनी शिबिरात रक्तदान केले.या सर्वांचा सत्कार करण्यात आला. हे शिबिर गाडगे महाराज धर्मशाळा, सोमवार पेठ येथे दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी हे शिबिर झाले.'रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट 'चे संस्थापक सदस्य अनिल बिहाणी यांनी त्यांचे १०० वे रक्तदान केले,संस्थापक राम बांगड यांनी १८१ वे तर गिरीश लाहोटी यांनी १५८ वे रक्तदान केले.,धीरज पुंगलिया उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  भिक्षेकऱ्यांचे  डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे समाजसेवक डॉ.अभिजीत सोनवणे हे होते.यावेळी  तिरुपती नागरी सहकारी संसंस्थेचे अध्यक्ष  जुगल पुंगलिया,धीरज पुंगलिया, गिरीधर काळे,संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.  

तिरुपती नागरी सहकारी संस्थेचे हे १४ वे रक्तदान शिबीर होते.शिबिरात २ हजार  रक्तदात्यांची उपस्थिती होती.त्यातील १००५ जणांनी रक्तदान केले.या शिबिरात १४ रक्तपेढ्यांनी रक्त संकलित केले."पुण्यात असलेला रक्तदानाचा तुटवडा काही दिवस तरी नक्कीच दूर होण्यास मोठी मदत होईल. रक्तदात्यांना अशा प्रकारे प्रोत्साहन देणारे उपक्रम वारंवार होणे गरजेचे आहे."असे राम बांगड यांनी सांगितले. 


 Give Feedback



 जाहिराती