सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
  • धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
  • थंडीचा कडाका वाढला; पुढील दोन दिवसात किमान तापमानात मोठी घट, हवामान खात्याचा इशारा
  • अजित पवारांचा पक्ष आंदेकर कुटुंबातील दोघांना उमेदवारी देण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे मोठे संकेत
  • ‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तसं!’ – काँग्रेसची नवी टॅगलाईन, सतेज पाटलांनी मनपासाठीचा प्लॅन मांडला
  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पक्षाचा राजीनामा देईन; प्रशांत जगतापांचा इशारा
  • अजित पवार चक्क महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता; पुण्यातील राजकीय घडामोडींकडे महाराष्ट्राचं लक्ष
 व्यक्ती विशेष

धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव झाकलं; 7 कर्मचारी निलंबित, प्रांताधिकाऱ्यांना नोटीस

डिजिटल पुणे    23-12-2025 18:16:54

भंडारा : भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या उमेदवाराचं नाव आणि नोटा (NOTA) पर्याय झाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी मतदान केंद्र प्रमुखासह 7 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निर्णय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असले तरी, या निवडणुकांदरम्यान झालेल्या निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी या प्रकरणाची दखल घेत कठोर कारवाई केली आहे.

ईव्हीएमवर उमेदवाराचं नावच गायब

प्रभाग क्रमांक 3 साठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनवर एकूण 5 उमेदवार आणि एक नोटा असा पर्याय असणे अपेक्षित होते. मात्र, मतदान यंत्र तयार करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार करुणा राऊत यांचं नाव आणि नोटा पर्याय झाकण्यात आला. परिणामी, ईव्हीएमवर केवळ 4 उमेदवारांची नावं दिसत होती आणि मतदारांना त्यांनाच मतदान करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.करुणा राऊत यांनी या प्रकाराबाबत तीव्र आक्षेप नोंदवत, आपल्याला जाणूनबुजून मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला आहे.

प्रशासनावर कारवाईचा बडगा

या प्रकरणाच्या चौकशीनंतर मतदान केंद्र प्रमुखासह 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडारा प्रांताधिकारी माधुरी तिखे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील चौकशीत आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती