पुणे : थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वायरमनवर खेड तालुक्यातील गाडकवाडी येथे दोन भावांनी जमावासमोर शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात वायरमन संतोष बोऱ्हाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यावर संदीप सरडे व रामदास सरडे या भावांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे.
घटनेचा शिवीगाळ आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे ग्रामीण भागात वीजबिल वसुली करताना महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेले वायरमन संतोष बोऱ्हाडे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर संदीप सरडे आणि रामदास सरडे या दोन भावांनी शिवीगाळ करत जमावासमोर मारहाण केली.या प्रकरणी खेड पोलिसांत दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आरोपी भावांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.महावितरण कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन अधिक कडक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.