सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र आले, शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
  • इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
  • ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा पराभव; राणा जगजितसिंहांनी ओमराजे निंबाळकरांच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'बाळा नाद करायचा नाही'
 जिल्हा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

डिजिटल पुणे    24-12-2025 11:59:21

मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करुन त्यानंतर कार्यादेश लवकरात लवकर जारी करण्यात यावा, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता. खंडाळा) येथे उभारण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी आवश्यक असलेली जमीन तत्काळ संपादित करावी. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजाला दिशा देणारे असून, त्यांच्या स्मृती जपणारे स्मारक भव्य व दिव्य स्वरूपाचे असावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथे असलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकाच्या विकासासाठी देखील स्वतंत्र आढावा घेण्यात आला. या बैठकीत तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी, तसेच विकास आराखड्यातील कामांना गती देण्याच्या सूचना मंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती